भाजपा मध्य मंडल महिला मोर्चा नाचणे जिल्हा परिषद गटातर्फे रक्षाबंधन साजरे

रत्नागिरी : पोलीस आपल्या समाजाचे रक्षण करण्यासाठी तसेच आपल्या सर्व बहिणींच्या सुरक्षतेतेसाठी दिवस-रात्र ते काम करत असतात. त्यांच्या या योगदानाची जाणीव आणि कृतज्ञता व्यक्त करत केंद्रीय महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा वनाथीअक्का श्रीनिवासन यांच्या सूचनेनुसार तसेच कोकण विभाग रक्षाबंधन संयोजक सौ. शिल्पा मराठे, भाजपा महिला मोर्चा रत्नागिरी दक्षिण तसेच रक्षाबंधन जिल्हा संयोजक सौ. वर्षा ढेकणे, मध्य मंडल भाजपाच्या महिला मोर्चा अध्यक्ष सौ. प्रियल जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली नाचणे जिल्हा परिषद गटातील भाजपा महिला मोर्चाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आज (९ ऑगस्ट) रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात पोलीस बांधवांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले.
यावेळेस जिल्हा उपाध्यक्ष सौ. अनुश्री आपटे, नाचणे ग्रामपंचायत सदस्य सौ. दीप्ती फडके, सौ. शिवानी रेमुळकर, मंदा ठीक, अश्विनी शेलार, मंजिरी चव्हाण, सुमन घाणेकर किंजल लिंगायत उपस्थित होत्या.



