‘मेन्यू २७’ २५० किमी खुल्या समुद्रातील नौकानयन मोहिमेचा रत्नागिरीतून थाटात शुभारंभ

रत्नागिरी : युवाशक्ती, सागरी वारसा आणि लष्करी शिस्तीचे भव्य दर्शन घडवत, २ महाराष्ट्र नवल युनिट एनसीसी, रत्नागिरीद्वारे आयोजित राष्ट्रीय स्तरावरील’मेन्यू २७’ (MENU 27) खुल्या समुद्रातील नौकानयन मोहिमेचा (Open Sea Sailing Expedition) आज अल्ट्राटेक जेटी, रत्नागिरी येथून उत्साहात शुभारंभ करण्यात आला.
कोल्हापूर एनसीसी ग्रुपचे ग्रुप कमांडर ब्रिगेडियर आर. के. पैठणकर यांच्या हस्ते आणि २ महाराष्ट्र नवल युनिटचे कमांडिंग ऑफिसर कमांडर रामंजुल दीक्षित यांच्या प्रमुख उपस्थितीत या मोहिमेला हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आले. याप्रसंगी भारतीय नौदल, कोस्ट गार्ड, जिल्हा प्रशासन, पोर्ट ऑफिस आणि कस्टम्स विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
संपूर्ण महाराष्ट्रातून निवडलेल्या६० उत्कृष्ट एनसीसी नौदल कॅडेट्सचा (३५ मुली आणि २५ मुले) यामध्ये समावेश आहे. ६ ते १५ ऑक्टोबर दरम्यान पार पडलेल्या १० दिवसांच्या पूर्व-तयारी शिबिरात (CATC-327) कॅडेट्सना सागरी नेव्हिगेशन, बोट पुलिंग, रिगिंग आणि आपत्कालीन बचावाचे कठोर प्रशिक्षण देण्यात आले आहे. २७ फूट लांबीच्या३ डीके व्हेलर (DK Whaler) नौकांचावापर करून कॅडेट्स रत्नागिरी ते पलशेत आणि परतीचा असा एकूण२५० किलोमीटरचा प्रवासखुल्या समुद्रात पूर्ण करतील. प्रवासादरम्यानतिवरी, जयगड, बोरिया आणि पलशेतया ठिकाणी बेड्यांचे थांबे असणार आहेत.
“कोकण ज्ञान तरंग”ही संकल्पना आणि“ज्ञानाच्या लाटा, प्रगतीच्या वाटा”या ध्येयवाक्यासह ही मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि मराठा आरमाराच्या ऐतिहासिक सागरी परंपरेला उजाळा देण्यात येत आहे. “ज्ञान आणि प्रगतीची वाट: आदर्श कोकणाच्या दिशेने नौकानयन” (Navigating Knowledge, Anchoring Progress: Sailing Towards an Ideal Konkan) या सामाजिक उपक्रमांतर्गत कॅडेट्स थांब्यांच्या ठिकाणी तटीय सुरक्षा (Coastal Security), सागरी प्रदूषण आणि समुद्र स्वच्छतेविषयी रॅली, पथनाट्य (Path Natyas) व प्रबोधनात्मक व्याख्याने आयोजित करतील.
ही मोहीम एनसीसीच्या ‘मोस्ट एंटरप्रायझिंग नेवल युनिट’ (MENU 27) या पंतप्रधान रोलिंग ट्रॉफीच्या राष्ट्रीय स्पर्धेचा मुख्य भाग असून, यामुळे महाराष्ट्र एनसीसी डायरेक्ट रेटला महत्त्वपूर्ण गुण मिळणार आहेत. कॅडेट्सच्या सुरक्षेसाठी ३ विशेष एस्कॉर्ट व बचाव नौका (Rescue Boats) ताफ्यासोबत तैनात आहेत. वेस्टर्न नवल कमांड, कोस्ट गार्ड स्टेशन रत्नागिरी, एमआरसीसी मुंबई, प्रादेशिक बंदर कार्यालय, कस्टम्स विभाग आणि रत्नागिरी जिल्हा प्रशासनाचे पूर्ण सहकार्य या मोहिमेस लाभले आहे.
यावेळी बोलताना कोल्हापूर एनसीसी ग्रुप कमांडर ब्रिगेडियर आर. के. पैठणकर म्हणाल, “ही मोहीम केवळ स्पर्धेपुरती मर्यादित नसून तरुणांमधील नेतृत्वगुण, साहस आणि शिस्त घडवणारी आहे. खुल्या समुद्रातील आव्हाने कॅडेट्सना कणखर बनवतील आणि कोकणाच्या समृद्ध सागरी इतिहासाची जाणीव करून देतील.”
२ महाराष्ट्र नवल युनिट एनसीसी, रत्नागिरीचे कमांडिंग ऑफिसर कमांडर रामंजुल दीक्षित, “आमचे कॅडेट्स केवळ समुद्राच्या लाटांशी दोन हात करणार नाहीत, तर किनारपट्टीवरील गावांमध्ये जाऊन सागरी स्वच्छता आणि तटीय सुरक्षेचा महत्त्वाचा संदेशही देतील.”



