मुख्य बातमी
जागतिक एड्स नियंत्रण दिनानिमित्त सोमवारी बाईक रॅली

रत्नागिरी : जागतिक एड्स नियंत्रण दिनानिमित्त एड्सविषयी जनजागृती करण्यासाठी व जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून एचआयव्ही तपासणीस प्रोत्साहित करण्यासाठी १ डिसेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता बाईक रॅली काढण्यात येणार आहे.
ही रॅली जिल्हा शासकीय रुग्णालय येथून सुरू होऊन जयस्तंभ मार्गे एसटी स्टँड येथून वळसा घालून साळवी स्टॉप मार्गे पुन्हा जिल्हा शासकीय रुग्णालय येथे समाप्त करण्यात येणार आहे, असे जिल्हा शल्य चिकित्सक तथा सदस्य सचिव जिल्हा एड्स नियंत्रण समिती भास्कर जगपात यांनी सांगितले.



