मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

प्रकाश साळवी यांच्या वाढदिवसानिमित्त आज जामसूत येथे नांगरणी स्पर्धा

आबलोली (संदेश कदम) : जय सोन साळवी ॲग्रो मंडप डेकोरेटर्स प्रकाश पांडुरंग साळवी यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त आज (११ ऑगस्ट) सकाळच्या वेळेत नांगरणी स्पर्धेचे आयोजन जामसूत येथील सहानेचे गावण येथे करण्यात आले आहे.

स्पर्धेत प्रथम क्रमांकास २५०१ रुपये, द्वितीय क्रमांकास १५०१ रुपये, तर तृतीय क्रमांकास १००० रुपये बक्षीस दिले जाणार आहे. या स्पर्धेसाठी ३०० रुपये प्रवेश फी आहे. त्याचप्रमाणे दुपारी १ वाजता भव्य गावठी जोडी नांगरणी स्पर्धा होणार असून, यासाठी ५०० रुपये प्रवेश शुल्क आहे. या स्पर्धेतील प्रथम क्रमांकास ७ हजार, द्वितीय क्रमांक ४ हजार एक रुपये, तृतीय क्रमांकात ३ हजार एक रुपये, चतुर्थ क्रमांकास २ हजार एक, पाचव्या क्रमांकास १ हजार एक रुपये असे बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे. सायंकाळी ७.३० वाजता स्नेहभोजन होणार आहे.

या नागरणी स्पर्धेसाठी प्रकाश साळवी, संतोष साळवी, शैलेश साळवी, अजित साळवी यांच्याकडे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!