जमीर खलफे यांना राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर

रत्नागिरी : गेली अनेक वर्षे पत्रकारिता क्षेत्रात आपले योगदान देणारे रत्नागिरी शहरातील ज्येष्ठ पत्रकार जमीर खलफे यांना वर्ल्ड फॉर नेचर इंडिया यांच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार २०२६ जाहीर करण्यात आला आहे.
जमीर खलफे यांचे सामाजिक कार्य मोठे आह. रत्नागिरी येथे सामाजिक कार्य करणाऱ्या संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरीचे ते रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष असून या माध्यमातून ते सातत्याने सामाजिक विविध उपक्रम राबवित असतात. सैतवडे एज्युकेशन सोसायटी चे ते सक्रिय सभासद आहेत, तर मराठी पत्रकार परिषद रत्नागिरीचे ते सचिव असून ही महत्त्वाची जबाबदारी ते अतिशय प्रभावीपणे राबवित आहेत.
श्री. खलफे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे. हा पुरस्कार सोहळा २२ नोव्हेंबर रोजी चिपळूण येथे मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या दिमाखात साजरा होणार आहे.



