कोकणमहाराष्ट्रमुख्य बातमी

खांबेटे वाचनालयात डॉ. रंगनाथन जयंती साजरी

म्हसळा : केशवराव खांबेटे सार्वजनिक वाचनालय म्हसळे (जि. रायगड) येथे ग्रंथालय शास्त्राचे जनक, भारताचे पहिले ग्रंथपाल, ग्रंथालयाचे मुहूर्तमेढ रोवणारे, द्विबिंदू वर्गीकरण पध्दतीचे शोध लावणारे संशोधक डाॅ. एस. आर. रंगनाथन यांची १३३ वी जयंती साजरी करण्यात आली.

वाचनालयाचे कोषाध्यक्ष सुनील उमरोटकर व वाचनालयाचे संचालक प्रा. शिरीष समेळ यांच्या हस्ते डाॅ. एस. आर. रंगनाथन आणि भारत मातेचे प्रतिमा पूजन करण्यात आले. वाचनालयाचे संचालक व वसंतराव नाईक व बॅरिस्टर ए. आर. अंतुले महाविद्यालयातील ग्रंथपाल प्रा. आर. एस. माशाले यांनी डॉ. एस. आर. रंगनाथन यांचे ग्रंथालय शास्त्रातील योगदान यावर समयोचित मनोगत व्यक्त केले. तद्नंतर केशवराव खांबेटे सार्वजनिक वाचनालयाचे ग्रंथपाल आणि म्हसळे तालुका वाचनालय चळवळीत मोलाचे योगदान देणारे उदय करडे तसेच वसंतराव नाईक व बॅरिस्टर ए. आर. अंतुले महाविद्यालयांतील ग्रंथपाल प्रा. आर. एस. माशाले यांचे वाचनालयाचे अध्यक्ष संजय खांबेटे आणि खजिनदार सुनील उमरोटकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी द्विबिंदू वर्गीकरण,तालिकीकरण: तात्विक, ग्रंथालय संघटन,वर्गीकरण: तात्विक, ग्रंथालय तंत्र व मंत्र, सार्वजनिक गांथालये, सार्वजनिक गांथालयांचे प्रबोधन, सार्वजनिक ग्रंथालय मार्गदर्शिका, चिंतन सार्वजनिक ग्रंथालयांचे / सविजनिक ग्रंथालयातील अभिलेख, ग्रंथालयीन संदर्भसेवा, ज्ञान आणि ग्रंथवर्गीकरण, ग्रंथ ग्रंथालय, ग्रंथ संस्कृती आदी प्रदर्शनातील पुस्तके वाचकांनी हाताळली.

कार्यक्रमाला केशवराव खांबेटे सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष संजय खांबेटे, खजिनदार सुनील उमरोटकर, संचालक आर. एस. माशाळे, शिरीष समेळ, एस. एन. गाडगे , कृषी सहा. खेडेकर, चाटे, परशुराम नाक्ती, निखिल येलवे, ग्रंथपाल उदय करडे, लिपीक सायली चोगले, मदतनीस प्राची मेंदडकर वाचक व हितचिंतक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!