मुख्य बातमी

आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त एड्स जनजागृती बाईक रॅली

रत्नागिरी : आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त १२ ऑगस्ट रोजी जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, जिल्हा शासकीय रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने युवा वर्गामध्ये एचआयव्ही एड्सबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले.

या बाईक रॅलीला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांनी हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली. रॅलीमध्ये गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, पटवर्धन महाविद्यालय, नवनिर्माण महाविद्यालय येथील विद्यार्थी व विद्यार्थिनी तसेच सामाजिक संस्थेचे कर्मचारी यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. तसेच अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विकास कुमरे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अंकुश शिरसाट, डॉ. सुतार, डॉ. गुरव, डॉ. रश्मी आठल्ये तसेच जिल्हा रुग्णालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

याच कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, मुंबई मार्फत आयोजित राज्यस्तरीय रेड रिबन प्रश्नमंजुषा स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवलेल्या पटवर्धन हायस्कूलच्या नित्या संदीप फणसे हिचा सत्कार जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. जगताप यांच्या हस्ते करण्यात आला. तिला प्रादेशिक स्तरावरील प्रश्नमंजुषा स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल शुभेच्छाही देण्यात आल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!