स्वातंत्र्य दिनी खोडदे मोहितेवाडी शाळेत सूर्या ग्रुप संघटनेतर्फे विद्यार्थ्यांना शालेय बॅग वाटप

आबलोली (संदेश कदम) : गुहागर तालुक्यातील खोडदे मोहितेवाडी येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा मोहितेवाडी या शाळेत स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून खोडदे मोहिते वाडी येथील सूर्या ग्रुप संघटनेच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना शालेय बॅग वाटप करण्यात आले.
“वारसा शिक्षणाचा, प्रयत्न प्रोत्सानाचा” या विश्वासाने प्रेरित होऊन सूर्या ग्रुप संघटनेने समाजाचे आपण देणे लागतो या प्रमुख उद्देशाने हा उपक्रम राबविला. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षण समिती अध्यक्ष, वाडीतील मान्यवर ग्रामस्थ, माता पालक बहुसंख्येने उपस्थित होते. शिक्षक व मान्यवरांनी यावेळी सूर्या ग्रुप या सामाजिक संस्थेचे राबविलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले.

यावेळी व्यासपीठावर वाडी प्रमुख दिनेश मोहिते, सामाजिक कार्यकर्ते काशिनाथ मोहिते, काशीराम मोहिते, विकास मोहिते, संदीप मोहिते, नितीन मोहिते, ग्रामपंचायत सदस्य सौ. शुभांगी डिंगणकर, मुख्याध्यापक संतोष भोसले, माजी मुख्याध्यापक अनंत पागडे, सौ. रश्मी सुर्वे, अंगणवाडी सेविका अक्षता मोहिते, मदतनीस तनिष्का मोहिते, सूर्या ग्रुपचे कार्यकर्ते जगदीश डिंगणकर, चंद्रकांत तांबे, पारस तांबे आदी उपस्थित होते.

