मुख्य बातमी

लायन्स क्लब ऑफ हातखंबा रॉयलतर्फे आयोजित तालुकास्तरीय पाककला स्पर्धा उत्साहात 

रत्नागिरी : प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही लायन्स क्लब ऑफ हातखंबा रॉयलच्या वतीने तालुकास्तरीय पाककला स्पर्धा १८ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आली होती. यावर्षी स्पर्धेचा विषय “ज्वारीचे पदार्थ” हा होता. या स्पर्धेसाठी तालुक्यातून ३५ स्पर्धक सहभागी झाले होते.

या स्पर्धेत सौ. वीणा सागर कासेकर (पदार्थ – ज्वारी राजा पोटली) यांनी प्रथम क्रमांक पटकावला. सौ. साक्षी सम्राट पाटील (पदार्थ – मोड आलेल्या ज्वारीचे कटलेट) या द्वितीय, तर अंतरा राहुल कळंबटे (पदार्थ – ज्वारीच्या खमंग वड्या) या तृतीय आल्या. सौ. राजश्री राजकुमार औंधकर (ज्वारीच्या लाह्यांचा केक) आणि ओंकार रविंद्र पाथरे (ज्वारीचे शुगर फ्री मोदक) यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. सौ. प्रज्ञा जयंत फडके (ज्वारीची हेल्दी भेळ) यांना उत्कृष्ट सादरीकरणाचे पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.

ही स्पर्धा ला. गिरीश शितप व ला. प्रतीक कळंबटे यांनी पुरस्कृत केली होती. तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना सन्मानचिन्हे ला. राजेंद्र डांगे यांच्या सौजन्यातून देण्यात आली. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून श्रीमती शेलार व श्री. ढोबाळे यांनी काम पाहिले.

या कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर म्हणून जिजाऊ संस्थेचे रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष ॲड. महेंद्र मांडवकर, प्रा. चंद्रमोहन देसाई, प्रा. हुसेन पठाण, प्रभाकर शितप, झरेवाडी ग्रा. पं. सदस्या सौ. नेहा कळंबटे, सौ. गौरी शितप संस्थापकीय अध्यक्ष ला. मनोजकुमार खानविलकर उपस्थित होते.

यावेळी क्लबचे अध्यक्ष ला. ॲड. अवधूत कळंबटे यांनी प्रास्ताविकातून क्लबच्या सेवाकार्यांची माहिती दिली. यावेळी परीक्षक श्रीमती शेलार, श्री. ढोबाळे आणि मान्यवरांपैकी श्री. देसाई, श्री. पठाण, श्री. खानविलकर, ॲड. महेंद्र मांडवकर यांनी आपले विचार व्यक्त केले. तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्लबचे उपाध्यक्ष ला. सचिन सावेकर यांनी केले. आभार ला. मंगेश जाधव यांनी मानले.

यावेळी क्लबचे संस्थापकीय अध्यक्ष ला. श्री. खानविलकर, अध्यक्ष ला. ॲड. अवधूत कळंबटे, सचिव ला. प्रतीक कळंबटे, खजिनदार ला. ॲड. संकेत लकेश्री, उपाध्यक्ष ला. सचिन सावेकर, सदस्या ला. नेहा सुर्वे, ला. दीप्ती कळंबटे, ला. जान्हवी डांगे, सदस्य ला. मंगेश जाधव, ला. राजेंद्र डांगे, ला. सुनील डांगे हे उपस्थित होते. यावेळी क्लबतर्फे गेल्या दोन वर्षात घेण्यात आलेल्या पाककला स्पर्धेतील निवडक पाककृतींचे पुस्तक छपाई करण्यात आले असून, या पुस्तकाचा मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन सोहळा संपन्न झाला. पुस्तक प्रकाशनासाठी ला. गिरीश शितप याने विशेष मेहनत घेतली. तसेच हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्वच लायन सदस्यांनी मेहनत घेतली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!