मुख्य बातमी
मेर्वी श्री स्वामी समर्थ मठात पौर्णिमेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम

गावखडी : रत्नागिरीत तालुक्यातील मेर्वी श्री स्वामी समर्थ मठात पौर्णिमेनिमित्त ३ जानेवारी रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ७ वाजता श्री स्वामी समर्थांची पूजा आणि ८ वाजता पादुकावर अभिषेक होईल. दुपारी १२ वाजता पालखी प्रदशिणा झाल्यानंतर १२.३० वाजता आरती, दुपारी १ वाजता महाप्रसादाचे वाटप केले जाईल.
भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मेर्वी मठाचे पुजारी सहदेव पावसकर यांनी केले आहे.



