मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

आंबेरे खुर्दच्या तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी पांडुरंग पाते यांची निवड

आबलोली (संदेश कदम) : गुहागर तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत आंबेरे खुर्द या ग्रामपंचायतच्या ग्रामसभेमध्ये महात्मा गांधी तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग गणपत पाते यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

पांडुरंग पाते हे गुहागर तालुका कुणबी नागरी सहकारी पतसंस्था लिमिटेड आबलोली या पतसंस्थेचे संचालक आहेत. कुणबी समाजाचे संघ मुंबई शाखा तालुका ग्रामीण या सामाजिक संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. ओबीसी संघर्ष समन्वय समितीचे ते गुहागर तालुकाध्यक्ष आहेत. भाग्योदय ज्ञान प्रसारक शिक्षण संस्था पाचेरी आगर – आंबेरे खुर्द या संस्थेचे ते सरचिटणीस म्हणून काम पाहत आहेत.

पांडुरंग पाते यांची आंबेरे गावच्या तंटामुक्त समिती अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांच्यावर गुहागर तालुक्यातील सर्व स्तरातून अभिनंदनचा वर्षाव करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!