मुख्य बातमी
जागतिक पांढरी काठी सुरक्षा दिनानिमित्त ‘आस्था’कडून जिल्हाधिकारी यांना निवेदन

रत्नागिरी : जागतिक पांढरी काठी सुरक्षा दिनानिमित्त (१५ ऑक्टोबर) आस्था सोशल फाउंडेशन रत्नागिरी या दिव्यांगांसाठी समर्पित संस्थेकडून जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांना निवेदन देण्यात आले.
यामध्ये अंध दिव्यांगांसाठी शैक्षणिक साहित्य, विशेष शाळा, रीडर रायटर पॅनल, रोजगार संधी, सुगम्य परिसर आदींची मागणी करण्यात आली. हे निवेदन देण्यासाठी आस्था सोशल फाउंडेशनच्या वतीने सचिव श्रीमती सुरेखा पाथरे, अंध दिव्यांग यश देवरुखकर, मोहंमद गडकरी, मोहंमद गौस शेख, दिव्यांगांचे पालक उपस्थित होते. जिल्हाधिकारी यांनी अंध दिव्यांगांच्या समस्या समजून घेतल्या व प्रशासनाकडून संपूर्ण सहकार्य मिळेल असे सांगितले.


