Uncategorized

रत्नागिरीत VLF इंटरनॅशनल ब्रँडची ‘Mobster-135’ दमदार पेट्रोल बाइक लाँच 

रत्नागिरी : आंतरराष्ट्रीय दर्जाच्या VLF या ब्रँडची बहुप्रतिक्षित ‘Mobster-135’ ही दमदार पेट्रोल बाईक शनिवारी (१७ जानेवारी) टीआरपी येथील सुरेख मोटर्सच्या दालनात आयोजित सोहळ्यात लाँच करण्यात आली. या बाईकचे उद्घाटन CIPD चे राष्ट्रीय अध्यक्ष व हॉटेल कार्निव्हलचे संचालक उदय लोध, बँक ऑफ महाराष्ट्रचे विभागीय व्यवस्थापक सागर नाईक, सीपीसी प्रमुख श्री. कुंभार, शाखा व्यवस्थापक नबास देवधर, चिपळूण अर्बन बँकेचे शाखा व्यवस्थापक समीर ठाकूर, मैत्री ग्रुपचे कौस्तुभ सावंत व सुहास ठाकूरदेसाई व सावंत परिवाराच्या उपस्थितीत करण्यात आले.

रत्नागिरी जिल्ह्यातील पहिली VLF Mobster-135 ही बाईक खरेदी करण्याचा मान साळवी कुटुंबाला मिळाला. या वेळी बोलताना मान्यवरांनी VLF ब्रँडच्या आधुनिक तंत्रज्ञानाचे आणि तरुणाईला आकर्षित करणाऱ्या डिझाइनचे विशेष कौतुक केले. Mobster-135 या बाइकमध्ये आकर्षक व स्टायलिश लूक, आधुनिक डिजिटल डिस्प्ले, सुरक्षिततेसाठी ABS, ड्युअल ट्रॅक्शन कंट्रोल, आरामदायी गॅस फिल्ड सस्पेन्शन तसेच मजबूत ड्युअल डिस्क ब्रेक यांसारखी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.

कार्यक्रमाचे आयोजक सुरेख मोटर्स गेल्या सहा वर्षांपासून इलेक्ट्रिक टू-व्हीलर क्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत असून, आता मोटो हाऊस (MOTOHAUS) या संकल्पनेच्या माध्यमातून त्यांनी पेट्रोल टू-व्हीलर क्षेत्रात दमदार प्रवेश केला आहे. यामुळे रत्नागिरीतील दुचाकीप्रेमींना आंतरराष्ट्रीय दर्जाचा नवा पर्याय उपलब्ध झाला असून, युवक वर्गात या बाइकबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

पत्ता : मोटोहाउस,अंबर हॉल शेजारी, टीआरपी, रत्नागिरी

संपर्क : ९६३७७६९३९६/९१७५१११८८८

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!