मुख्य बातमी

गणेशोत्सवात ‘गडकिल्ले संवर्धन’ जनजागृतीसाठी यशस्वी पोस्टर मोहीम

रत्नागिरी : गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य, रत्नागिरी शाखेच्या वतीने गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवाच्या निमित्ताने गडकिल्ल्यांच्या संवर्धनाविषयी जनजागृती करणारी पोस्टर मोहीम प्रभावीपणे राबविण्यात आली.

ही मोहीम गणेशभक्तांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे अत्यंत यशस्वी ठरली. हजारो भाविकांपर्यंत गडकिल्ले संवर्धनाचा संदेश पोहोचवण्यात यश मिळाले. गडकिल्ल्यांविषयी इतिहासप्रेम, अभिमान आणि संवर्धनाची भावना अधिक दृढ करण्याचा प्रयत्न या माध्यमातून साध्य झाला.

“गडकिल्ले आपले वारसा, त्यांचे संवर्धन आपली जबाबदारी!” या घोषवाक्याशी एकनिष्ठ राहून, प्रतिष्ठानकडून केवळ जनजागृती नव्हे, तर भावी पिढ्यांसाठी ऐतिहासिक वारसा जतन करण्याचा संकल्पही घेण्यात आला आहे.

या यशस्वी मोहिमेत खुशी गोताड, समृद्धी चाळके, रुची गोताड, वैष्णवी चव्हाण, दीपेश वारंग, मयूर भितळे, शुभम आग्रे, सौरव बळकटे, नयन कदम, तन्मय जाधव, ओंकार सावंतदेसाई, सुजल सोळंके, सचिन कळंबटे आणि प्रीतम सुर्वे यांनी उत्साहाने सहभाग घेतला.

या मोहिमेमुळे स्थानिक तरुणांमध्ये इतिहास आणि वारसासंवर्धनाबाबतची जाणीव अधिक तीव्र होत असून, अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक परिवर्तन घडून येईल, असा विश्वास प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

सदस्य नोंदणीसाठी संपर्क : दीपेश वारंग – 99209 05920, तन्मय जाधव – 8379012347

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!