मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

चिपळूण पिंपळी खुर्द येथे तिघांचा नदीच्या डोहात बुडून मृत्यू

चिपळूण : नदीवर कपडे धुण्यासाठी गेले असताना लहान मूलगा पाण्यात पडला असता त्या मुलाला वाचवताना आई आणि सोबत असलेली मुलाची आत्या डोहात बुडाली. ही घटना चिपळूण पिंपळी खुर्द येथे वडाचा डोह येथे आज शुक्रवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली. पिंपळी येथील दुर्दैवी घटनेत लता कदम (वय ३५), लक्ष्मण कदम (वय ८) आणि रेणुका शिंदे ( वय ४५) यांचा बुडून मृत्यू झाला आहे.

पाण्यात खेळत असताना मुलाचा तोल गेल्याने मुलगा डोहात पडला. त्यानंतर मुलाला वाचवण्याचे प्रयत्न करताना आई आणि सोबत असलेली मुलाची आत्याही बुडाल्यामुळे खळबळ उडाली आहे. या घटनेचे वृत्त समजताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!