मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

आमसभेत आमदार भास्कर जाधव यांनी केला आबलोली ग्रामपंचायतीचा सन्मान

आबलोली (संदेश कदम) : गुहागर तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत आबलोली ग्रामपंचायतीला संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्वच्छता स्पर्धा २०२३-२४ मध्ये जिल्हास्तरीय विशेष पुरस्कार प्राप्त झाला. याबद्दल पंचायत समिती गुहागर स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) यांच्यामार्फत गुहागर मोडका आगर येथील श्री पूजा मंगल कार्यालय येथे झालेल्या आमसभेत निर्मल ग्रामपंचायत आबलोलीला गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी सरपंच सौ. वैष्णवी वैभव नेटके, ग्रामपंचायत अधिकारी बाबुराव सूर्यवंशी, उद्योजक सचिन बाईत, ग्रामपंचायत सदस्य ऋषिकेश बाईत, माजी सभापती सौ. पूर्वी निमुणकर, स्वरा नेटके, पूजा कारेकर उपस्थित होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!