जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे २७ सप्टेंबरला रोजगार मेळावा

रत्नागिरी : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांनी जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे २७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता, पटवर्धन हायस्कूल, ज्युनि. कॉलेज, मारुती आळी, आठवाडा बाजार शेजारी, नवीन इमारत, सी विंग, ता. जि. रत्नागिरी येथे केले आहे.
जिल्ह्यातील सर्व उमेदवारांनी रोजगार संधीचा लाभ घेण्यासाठी त्यांची नोंदणी या विभागाच्या www.mahaswayam.gov.in पोर्टलवर करावी, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकताचे प्र.सहाय्यक आयुक्त मोरेश्वर दुधाळ यांनी केले आहे.
नोंदणीकृत असलेल्या सर्व उमेदवारांनी त्यांचे प्रोफाईल अद्ययावत करावे. नोंदणी केलेल्या उमेदवारांनी त्यांच्याकडील युझर आयडी व पासवर्डच्या सहायाने २७ सप्टेंबर रोजीच्या पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यामध्ये ऑनलाईन अप्लाय करून मेळाव्याच्या दिवशी मुलाखतीसाठी बायोडाटा व इतर आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांच्या प्रतींसह प्रत्यक्ष उपस्थित राहावे.
रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी होण्यासाठी आपली नोंदणी नसल्यास कार्यालयाकडे त्वरित संपर्क साधून नोंदणी करावी व रोजगार मेळाव्यात सहभागी होऊन रोजगार संधीचा लाभ घ्यावा असे, आवाहन प्र.सहाय्यक आयुक्त श्री. दुधाळ यांनी केले आहे.



