१७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई : महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांमध्ये १६ ते १८ सप्टेंबर दरम्यान मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गेले काही दिवस पावसाने विश्रांती घेतल्यानंतर आता पुन्हा एकदा राज्यभर पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे.
हवामान तज्ञांनी सूचित केले आहे की, सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात राज्यात परतीचा मान्सून सक्रिय होऊ शकतो. दरम्यान, आता पुन्हा एकदा राज्यात पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे.
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, १६ ते १८ सप्टेंबर दरम्यान राज्यात मुसळधार ते मध्यम पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर शुक्रवारपासून वातावरणात बदल दिसून येत आहेत आणि हवेतील आर्द्रता वाढू लागली आहे. हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे की मान्सून परतण्याची ही सुरुवातीची चिन्हे आहेत.
गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर, पावसाने पुन्हा जोरदार पुनरागमन केले आहे. ज्यामुळे राज्यात पुन्हा एकदा हवामान आल्हाददायक झाले आहे. राज्यातील १७ जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, अहमदनगर, लातूर, नांदेड, बीड, परभणी, हिंगोली, यवतमाळ या सर्व ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. यासोबतच नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नदीकाठच्या नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.



