मुख्य बातमी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त रत्नागिरीत विश्वेश्वर मंदिरात अभिषेक व स्वच्छता अभियान

रत्नागिरी : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी रत्नागिरी शहरच्या वतीने विश्वेश्वर मंदिर येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांतर्गत मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. तसेच अहिल्यादेवींच्या स्मरणार्थ भगवान विश्वेश्वरावर अभिषेक करण्यात आला.


या उपक्रमात भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष राजेशजी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली,भाजप शहराध्यक्ष दादा ढेकणे,महिला शहराध्यक्ष पल्लवी पाटील, सत्यवती बोरकर,भक्ती दळी, संपदा तळेकर, राजन फाळके, राजन पटवर्धन, अमित विलणकर, विक्रम जैन, मंदार खंडकर, संदीप सुर्वे, निलेश आखाडे, बबलू विलणकर, समीर वस्ता, मनोज पाटणकर, शैलू बेर्डे, मुन्ना ढेकणे, सिद्धेश नाईक, प्राजक्ता म्हादये आणि स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
या प्रसंगी अहिल्यादेवी होळकर यांचे सामाजिक कार्य, न्यायप्रियतेची परंपरा आणि जनसेवेतील योगदान याचे स्मरण करण्यात आले. त्यांच्या आदर्श जीवनशैलीचा आदर्श घेऊन समाजसेवेची प्रेरणा घेण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाचे आयोजन भाजप शहराध्यक्ष दादा ढेकणे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते. या निमित्ताने मंदिर परिसर स्वच्छता करण्यात येत सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश देण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!