मुख्य बातमी

मूल्यवर्धित मत्स्यपदार्थ’ व्यवसायातून कोकणातील महिलांचा शाश्वत विकास शक्य : डॉ. केतन चौधरी

रत्नागिरी : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत असलेल्या येथील ‘सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रात शिरगाव येथील मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन आणि आसमंत फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय मत्स्य पदार्थ निर्मिती प्रात्यक्षिक-प्रशिक्षण घेण्यात आले.

कार्यक्रमाच्या आयोजनासाठी कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय भावे, संचालक, विस्तार शिक्षण डॉ. राजेश ठोकळ, संशोधन संचालक डॉ. प्रशांत शहारे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच या कार्यक्रम आयोजन करण्यासाठी आसमंत फाऊंडेशनकडून आर्थिक साह्य मिळाले.

या कार्यक्रमाचे उद्घाटन सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी डॉ. केतन चौधरी यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. चौधरी यांनी मत्स्य व्यवसायाचा शाश्वत विकास करायचा असेल तर, पकडलेल्या मासळीवर प्रक्रिया करून मूल्यवर्धित मत्स्य पदार्थ तयार करणे गरजेचे आहे, जेणेकरून मच्छिमारांच्या उत्पन्नात वाढ होईल, असे सांगितले.

मत्स्य पदार्थ निर्मितीच्या प्रशिक्षणाची जबाबदारी कुलगुरु डॉ. संजय भावे यांनी निर्देशित केल्याप्रमाणे सागरी जीव शास्त्रीय संशोधन केंद्र आणि मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन यांनी घेतली आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्रा. डॉ. आसिफ पागरकर, प्राध्यापक, जलजीविका संस्थेचे जिल्हा समन्वयक चिन्मय दामले तसेच लोककल्प फाउंडेशनचे अभिषेक कात्रे हे उपस्थित होते.

या मत्स्य पदार्थ निर्मिती प्रात्यक्षिक-प्रशिक्षणा मध्ये एकूण ६९ लाभार्थी उपस्थित होते. हा कार्यक्रम मुख्यत: उमेद-क्रांती प्रभाग संघच्या तिवंडेवाडी, बसणी, शिरगाव, काळबादेवी येथील महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. कोलिम चटणी, कोळंबी लोणचे, कालवांचे लोणचे यांचे प्रात्यक्षीक सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे श्रीमती अपूर्वा सावंत, श्रीमती वर्षा सदावर्ते, डॉ. मनोज घुगुस्कर, प्रा. नरेंद्र चोगले, तेजस जोशी, प्रशांत पिळणकर आणि प्रा. सचिन साटम यांनी करून दाखविले. बोंबील चटणी व मत्स्य चकली यांचे प्रात्यक्षिक जलजीविकाचे समृद्धी सनगरे, सृष्टी यांनी करून दाखविले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती मयुरी डोंगरे (मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन) यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ. नंदिनी शेट्ये (काळबादेवी) यांनी केले.

सर्व सहभागींना मान्यवरांच्या हस्ते प्रशिक्षण प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. यावेळी सहभागी शेतकरी महिलांपैकी श्रीमती सोनाली शिवलकर (क्रांती, एफ.पी.ओ., मास्टर सी.आर.पी.) यांनी मनोगत व्यक्त केले आणि प्रशिक्षण आयोजित केल्याबद्दल आभार व्यक्त केले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यास मत्स्य अभियांत्रिकी तंत्रज्ञानमधील नीलेश मिरजकर, डॉ. राकेश जाधव, सुशील कांबळे, रोहित बुरटे, पंकज सिडाम, संदेश चव्हाण, तसेच सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे अधिकरी डॉ. मनोज घुगुस्कर, प्रा. नरेंद्र चोगले, प्रा. सचिन साटम, श्रीमती वर्षा सदावर्ते आणि श्रीमती अपूर्व सावंत, प्रवीण गायकवाड व केतन चव्हाण यांनी मेहनत घेतली. तसेच जलजीविकाचे पीयूषा देसाई, शशांक पंडित, सुमित कुळये, लोककल्प फाउंडेशनचे श्री. जोशी आणि श्री. हरमळे यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!