भाजपा दक्षिण युवा मोर्चाच्या वतीने १७ सप्टेंबर रोजी रक्तदान शिबिर

रत्नागिरी : भारतीय जनता पार्टीचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त आणि रत्नागिरीचे संपर्क मंत्री व महाराष्ट्र राज्याचे बंदर विकास मंत्री श्री. नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी भारतीय जनता पार्टी दक्षिण युवा मोर्चाच्या वतीने १७ सप्टेंबर रोजी रक्तदान शिबिर आयोजित केले आहे. रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या रक्तपेढी येथे सकाळी १० ते दुपारी २ यावेळेत ही शिबिर होणार असून, यावेळी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते येथे उपस्थित राहणार आहेत.
या रक्तदान शिबिरामध्ये रत्नागिरीतील रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा, असे आवाहन युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मंदार खंडकर, दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष वर्षा ढेकणे यांनी केले आहे.

