रत्नागिरीतील खेळाडूंचे विभागीय शालेय तायक्वांदो स्पर्धेमध्ये यश
राज्य शालेय तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड

रत्नागिरी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे कोल्हापूर विभागीय शालेय स्पर्धा २०२५-२६ कोल्हापूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या वतीने वडणगे येथे १२ व १३ सप्टेंबर रोजी पार पडल्या. या स्पर्धेमध्ये रत्नागिरी तालुक्यातील तायक्वांदो क्लबच्या खेळाडूंनी सहभाग नोंदवून ३ सुवर्ण, तर ५ कांस्यपदकांची कमाई केली.
पदक विजेते खेळाडू असे : सुवर्णपदक – स्वरा साखळकर, सार्थक चव्हाण, अध्या कवीतके. कांस्यपदक – मृण्मयी वांगणकर, यज्ञा चव्हाण, मृदुला पाटील, त्रिशा मयेकर, गौरी विलणकर यांनी पदक संपादन केले. सुवर्णपदक खेळाडूंचे छत्रपती संभाजी नगर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. या सर्व खेळाडूंना तायक्वांदो प्रशिक्षक व राष्ट्रीय पंच सौ. आराध्या प्रशांत मकवाना व शाहरुख शेख यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
खेळाडूंच्या यशाबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे, तालुका क्रीडा अधिकारी गणेश जगताप, तालुका समन्वयक विनोद मयेकर, महाराष्ट्र राज्य संघटनेचे कोषाध्यक्ष व्यंकटेशराव कररा, जिल्हा उपाध्यक्ष विश्वास लोखंडे, खजिनदार शशांक घडशी, सचिव लक्ष्मण कररा, तायक्वांदो प्रशिक्षक मिलिंद भागवत, मुख्याध्यापक, पालक, क्रीडाशिक्षक, संस्थेचे संचालक, तायक्वांदो क्लबचे सर्व पदाधिकारी, पालक यांनी अभिनंदन केले असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.



