मुख्य बातमी

उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे १६ ऑक्टोबर रोजी त्नागिरी दौऱ्यावर दौरा

रत्नागिरी : राज्याचे उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गुरुवारी (१६ ऑक्टोबर) जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे.

त्यांचा दौरा कार्यक्रम असा : १६ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता दरे हेलिपॅड, (ता. महाबळेश्वर, जि. सातारा) येथून हेलिकॉप्टरने रत्नागिरी विमानतळ हेलिपॅडकडे प्रयाण करतील. सकाळी ११ वाजता रत्नागिरी विमानतळ हेलिपॅड येथे आगमन व मोटारीने तारांगणकडे प्रयाण करतील. सकाळी ११.१५ वाजता “कोकणातील भारतरत्न शिल्प” लोकार्पण सोहळ्याला उपस्थिती दर्शविल्यानंतर दुपारी १२ वाजता मोटारीने शिवसेना कार्यालय, आठवडा बाजार, रत्नागिरीकडे प्रयाण करतील. तेथे दुपारी १२.१५ वाजता धर्मवीर आनंद दिघे नागरी सहाय्यता केंद्र उद्घाटन सोहळ्याला उपस्थिती. दुपारी १२.२५ वाजता मोटारीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रयाण. दुपारी १२.३० वाजता रत्नागिरी जिल्ह्यातील विविध विकास कामाचा आढावा बैठक होईल. दुपारी १.२५ वाजता मोटारीने शासकीय विश्रामगृह, रत्नागिरीकडे प्रयाण. दुपारी १.३० वाजता राखीव. दुपारी २ वाजता मोटारीने स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृह, रत्नागिरीकडे प्रयाण होईल. येथे दुपारी २.१५ वाजता शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा होईल. त्यानंतर दुपारी ३ वाजता मोटारीने रत्नागिरी विमानतळ हेलिपॅडकडे प्रयाण करतील. दुपारी ३.१५ वाजता रत्नागिरी विमानतळ हेलिपॅड येथे आगमन व हेलिकॉप्टरने दरे हेलिपॅडकडे (ता. महाबळेश्वर, जि. सातारा) प्रयाण करतील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!