क्रीडामुख्य बातमी

नाईट अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धेत महालक्ष्मी उंबरवाडी संघ विजेता

बीएससी स्पोर्ट क्लब संघाला उपविजेतेपद 

रत्नागिरी : तालुक्यातील कोतवडे येथे बौद्धजण पंचायत समिती शाखा क्रमांक १४ पुरस्कृत बी एससीस्पोर्ट क्लब आयोजित भव्य नाईट अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धा १० ते १४ फेब्रुवारी या कालावधीत खेळवण्यात आली. या स्पर्धेचे विजेतेपद महालक्ष्मी उंबरवाडी संघाने पटकावले. तर बीएससी स्पोर्ट क्लब संघ उपविजेता ठरला.

या स्पर्धेदरम्यान प्रमुख पाहुणे जिल्हा परिषद गट सदस्य राजू साळवे, पंचायत समिती सदस्य स्वप्नील उर्फ तारक मयेकर, कोतवडे ग्रामस्थ मंडळ मुंबई सचिव संजय कोलगे, बौद्धजन पंचायत समितीचे अध्यक्ष आयु. सुनील कांबळे, उपाध्यक्ष आयु. नरेश कांबळे, सचिव आयु. दिनकर कांबळे, सह सचिव आयु. निलेश कांबळे, अरविंद कांबळे, रूपेश कांबळे, सूरज कांबळे, कुंदन कांबळे, मयुर कांबळे, रोहन कांबळे, सुमित कांबळे, प्रतीक कांबळे, राज कांबळे, अतुल जाधव, सुहास मोहिते, निकेतन कांबळे, राकेश कांबळे, नितेश कांबळे, बौद्धजण पंचायत समितीच्या महिला अध्यक्षा सौ. कविता कांबळे, उपाध्यक्षा स्मिता कांबळे सचिव सौ. दिया कांबळे, संजीवनी कांबळे, नेहा कांबळे, समीक्षा कांबळे आदी मान्यवरांनी उपस्थिती लावली.

स्पर्धेतील विजेत्या महालक्ष्मी उंबरवाडी संघाला रोख रक्कम ७,७७७ रुपये व चषक तसेच उपविजेता बीएससी स्पोर्ट क्लब संघाला चषक व रोख १,१११ रुपये व चषक देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेसाठी वैयक्तिक बक्षिसे देण्यात आली. सामनावीर पुरस्कार राज कांबळे उत्कृष्ट फलंदाज प्रणव कोळगे मॅन ऑफ सिरीज परेश यांना सन्मानित करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!