मुख्य बातमी

मेर्वी जिल्हा परिषद गुरववाडी शाळेत मुलांना राखी बनविण्याचे प्रशिक्षण

गावखडी : रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी गुरववाडी (सेमी इंग्रजी) येथील शाळेत मध्ये मुख्याध्यापक मसरज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या सहशिक्षिका सौ. शाहनाज भाटकर यांनी मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी राखी बनविण्याचे प्रशिक्षण मुलांना दिले.

सर्व मुलांनी ते आनंदाने आत्मसात केले. यावेळी अंगणवाडी सेविका सौ. सत्यश्री खर्डे व मदतनीस सौ. स्नेहा कुरतडकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. मुलांना प्रोत्साहन देऊन त्यांच्यातील कला गुण विकसित करण्यासाठी शाळेतील शिक्षक नेहेमीच विविध उपक्रम राबवत असतात. शाळेच्या वतीने व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सौ. दीप्ती पावसकर यांनी शिक्षकांचे आभार व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!