आरोग्यमुख्य बातमी

सार्वजनिक आरोग्य विभाग संचालकांची आणि  कोल्हापूर आरोग्य सेवा परिमंडळाच्या उपसंचालकांची कोतवडे प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट

रत्नागिरी : राज्याचे सार्वजनिक आरोग्य संचालक डॉ. नितीन अंबाडेकर आणि कोल्हापूर आरोग्य सेवा परिमंडळाचे उपसंचालक डॉ. दिलीप माने यांनी तालुक्यातील कोतवडे प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली.

याप्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप, सहाय्यक संचालक कुष्ठरोग डॉ. विवेकानंद बिराजदार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेश्वरी सातव व प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मुक्तेश्वरी पाखरे व कर्मचारी उपस्थित होते.

सध्या सुरू असलेल्या स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियानाबद्दल माहिती घेऊन दर्जेदार आरोग्य सेवा कशी देता येईल याबाबत त्यांनी  मार्गदर्शन केले. तसेच कोतवडे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कामकाजाबाबत व स्वच्छतेबाबत समाधान व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!