महाराष्ट्रमुख्य बातमी

नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर

मुंबई : राज्यातील २४७ नगरपालिका व ४२ नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

राज्य निवडणूक आयोगाने २१ ऑगस्ट २०२५ च्या अधिसूचनेन्वये १ जुलै २०२५ ही कट ऑफ डेट जाहीर केला असून, त्या दिवशी (म्हणजेच दि.०१/०७/२०२५ रोजी) अस्तित्वात असलेली महाराष्ट्र विधानसभेची मतदार यादी या सार्वत्रिक निवडणुकांसाठी वापरण्यात येईल. या मतदार यादीच्या आधारे प्रभागनिहाय मतदारांचे विभाजन करण्याची कार्यवाही करण्यात यावी. याकरिता राज्य निवडणूक आयोगाचे आदेश क्र. रानिआ/ग्रापंनि-२०२३/प्र.क्र.०३/का-८, दि.१६/०७/२०२५ मध्ये दिलेल्या सूचनांनुसार कार्यवाही करावी.

ही मतदार यादी ग्राह्य धरून उपरोक्त नगरपालिका, नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम असा राहील : प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करणे ८ ऑक्टोबर २०२५. प्रारूप मतदार यादीवर हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी – ८ ऑक्टोबर ते १३ ऑक्टोबर. अंतिम प्रभागनिहाय मतदार याद्या अधिप्रमाणित करून प्रसिद्ध करणे – २८ ऑक्टोबर. मतदान केंद्रांची यादी प्रसिद्ध करणे- ७ नोव्हेंबर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!