मुख्य बातमीराजकारण
मत्स्यव्यवसाय, बंदरे मंत्री नितेश राणे यांचा जिल्हा दौरा

रत्नागिरी : राज्याचे मत्स्यव्यवसाय, बंदरे मंत्री नितेश राणे हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे आहे.
शनिवार, २६ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता मोटारीने रत्नागिरीकडे प्रयाण. रात्री ८ वाजता रत्नागिरी शासकीय विश्रामगृह येथे आगमन व मुक्काम. रविवारी (२७ जुलै) सकाळी ९.३० वाजता मोटारीने मिरकरवाडा बंदर, रत्नागिरीकडे प्रयाण. सकाळी १० वाजता केंद्र व राज्य शासन पुरस्कृत योजनेंतर्गत मिरकरवाडा मासेमारी बंदराचा विकास करणे या कामाच्या भूमिपूजन समारंभास पालकमंत्री रत्नागिरी यांच्यासमवेत उपस्थित. (स्थळ : मिरकरवाडा बंदर, रत्नागिरी).



