महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती शासकीय तंत्रनिकेतनमध्ये साजरी

रत्नागिरी : येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये आज (२ ऑक्टोबर) राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती अत्यंत आदराने साजरी करण्यात आली.
महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या दालनात आयोजित केलेल्या या कार्यक्रमात महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी वक्त्त्यांनी महात्मा गांधींच्या अहिंसा, सत्य आणि शांती या तत्त्वज्ञानाचे तसेच लालबहादूर शास्त्री यांच्या ‘जय जवान, जय किसान’ या प्रेरणादायी घोषणेचे महत्त्व स्पष्ट केले. दोघांनीही देशासाठी दिलेल्या योगदानाचे स्मरण करून त्यांच्या आदर्शांवर चालण्याची प्रेरणा उपस्थितांना देण्यात आली.



