महाराष्ट्रमुख्य बातमी

पुणे येथे पीएमपीएल बसला भीषण आग; जीवितहानी नाही

पुणे (प्रतीक चव्हाण) : १० ऑक्टोबर सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास पिंपरी चिंचवड-निगडी पवळे उड्डाण पुलाखाली पुणे महानगरपालिका पीएमपीएल बसला भीषण आग लागली. बसमध्ये सुमारे २५ प्रवासी प्रवास करत होते; मात्र वेळीच सर्व प्रवाशांना सुखरूप बसमधून उतरवण्यात आल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

दरम्यान, आगीचे कारण सध्या स्पष्ट झाले नाही. आग विझवण्यासाठी त्वरीत अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि विनाविलंब आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. निगडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्री. बनसोडे यांनी घटनेचा पंचनामा केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!