जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात ७२ लिपिक टंकलेखक पदाकरिता भरती
माजी सैनिक उमेदवारांनी ५ नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

रत्नागिरी : सैनिक कल्याण विभाग व विभागाच्या अधिपत्याखालील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील लिपिक टंकलेखक (गट क) एकूण ७२ पदाकरिता फक्त माजी सैनिक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांना वेब बेस्ड (Web-based) ऑन लाईन अर्ज www.mahasainik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ५ नोव्हेंबर रात्री ११.५९ वाजेपर्यंत सादर करणे आवश्यक राहील, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी कळविले आहे.
७२ पदांपैकी १ पद हे अपंग संवर्गातील किमान ४० टक्के अपंगत्व असलेल्या उमेदवारांमधून दिव्यांगत्वाच्या प्रकारांनुसार कर्तव्ये व जबाबदारीचा विचार करून गुणवत्ता/उपलब्धतेनुसार भरण्यात येणार आहे. ही भरती प्रक्रिया टीसीएस आयओएन यांच्यामार्फत होणार असून परीक्षेसाठी अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्यात येतील. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. पात्र उमेदवारांना वेब बेस्ड (Web-based) ऑन लाईन अर्ज www.mahasainik.maharashtra.gov.inया संकेतस्थळावर (Resources Tab –> Recruitment Tab येथे दि. १४ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजल्यापासून दिनांक ५ नोव्हेंबर रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत सादर करणे आवश्यक राहील. त्यानंतर वेब लिंक बंद होईल. या भरतीचा जिल्ह्यातील माजी सैनिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.



