मुख्य बातमी

महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोग सदस्य गोरक्ष लोखंडे उद्या रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोग, मुंबईचे सदस्य (सचिव दर्जा) गोरक्ष लोखंडे हे उद्या (१५ ऑक्टोबर) जिल्हा दौऱ्यावर येत असून, त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे आहे.

दि. १५ ऑक्टोबर रोजी रायगड येथून सोयीनुसार बाय रोड रत्नागिरीकडे रवाना व शासकीय विश्रामगृह येथे आगमन व मुक्काम. दि. १६ ऑक्टोबर सकाळी ११ वाजता गोरक्ष लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली रत्नागिरी नगरपालिकेतील सभागृहामध्ये मुख्याधिकारी खेड, रत्नागिरी, गुहागर, चिपळूण, दापोली नगरपालिका यांच्याकडे प्राप्त होणाऱ्या महसुलाचा एकूण ५ टक्के निधी आस्थापना, वजा खर्च, आर्थिक दुर्बल घटकावर केलेल्या खर्चाची मागील ५ वर्षांचा आढावा व कामाची तपासणी तसेच अनुसूचित जातीसाठी प्राप्त होणारा निधी बाबत अढावा व तपासणी करणार आहेत. लाड पागे, दलित वस्ती अण्णा भाऊ साठे सुधार योजना व अनुकंपाबाबत आढावा बैठक होईल.

दुपारी १२ वाजता रत्नागिरी नगरपालिकेतील समिती सभागृहात महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य श्री. लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी नाशिक यांच्या सोबत संविधान -५ निधी बाबत आढावा बैठक होईल. त्यानंतर दुपारी १ वाजता त्याच ठिकाणी श्री. लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यासोबत ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत आढावा बैठक होईल. दुपारी १.३० वाजता मुख्य अभियंता सा. बां. विभाग रत्नागिरी यांच्या अंतर्गत येणाऱ्या नागरिक दलित वस्ती आढावा व तपासणी होईल. सोयीनुसार रत्नागिरी येथून शासकीय विश्रामगृह सिंधुदुर्गकडे रवाना व मुक्काम.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!