शिववंदना मित्रपरिवाराच्या वतीने धायरी (पुणे) येथे गड किल्ले बनवण्याच्या स्पर्धेचे आयोजन

पुणे (प्रतीक चव्हाण) : गड, किल्ल्यांचे महत्त्व जपण्यासाठी आणि मुलांना गडकिल्ल्यांची ओळख व्हावी या हेतूने धायरीतील (पुणे) शिववंदना मित्रपरिवाराच्या वतीने गेल्या ११ वर्षांपासून संस्थेचे अध्यक्ष प्राज भिलारे गड किल्ले बनवण्याची स्पर्धा आयोजित करत आहेत. यंदाही या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
गडकोट, गडकिल्ले, बनवण्यासाठी लहान मुलांना युवा पिढीला समजण्यासाठी पाहण्यासाठी तो अनुभवण्यासाठी हा उपक्रम राबविला जातो. गेल्या ११ वर्षांपासून प्राज भिलारे हे शिवजयंती उत्सव, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ऐतिहासिक कार्यक्रमाचे आयोजन नियोजन, हिंदुत्व संदर्भात जनजागृती, सर्वसामान्यांना मदत, सामाजिक कार्य त्याचबरोबर, कट्टर हिंदुत्ववादी संघटनेसाठी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित दरवर्षी विविध प्रकारचे उपक्रम घेत आहेत.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नावनोंदणी करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी 8459259540 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.



