मुख्य बातमी

किल्ले रत्नदुर्गवर २४ ऑक्टोबर रोजी भव्य दीपोत्सव

रत्नागिरी : गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानच्या रत्नागिरी विभागाच्या वतीने किल्ले रत्नदुर्गवर भव्य दीपोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा २४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता रत्नदुर्ग किल्ल्याच्या पायथाशी रंगणार आहे.

“दिवाळीचा पहिला दिवस महाराजांच्या चरणी अर्पण करूया” असा विचार घेऊन गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानच्यायला वतीने दिवाळीच्या पहिल्या दिवशी गड आणि किल्ले दीपोत्सवाने उजळविण्यात येणार आहेत.

या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी आणि किल्ल्यावर एक एक दिवा प्रज्वलित करण्यात समस्त रत्नागिरीकरांनी उपस्थित राहाव, असे आवाहन आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ८३७९०१२३४, ९९२०९०५९२०, ७६६६७०८२०१ या क्रमांकांवर संपर्क साधावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!