मुख्य बातमी

अमृत दुर्गोत्सव अंतर्गत मेर्वी प्राथमिक मराठी शाळेला अभिनंदन पत्र प्राप्त

गावखडी : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतीला उजाळा मिळावा म्हणून जागतिक वारसाच्या वास्तू म्हणून प्रमाणित केलेल्या बारा किल्ल्यांपैकी दीपावली सुट्टीत एखाद्या दुर्गाची प्रतिकृती तयार करून त्या सोबत सेल्फी काढून अमृत दुर्गोत्सव २०२५ च्या वेबसाईटवर फोटो अपलोड करण्यासाठी सहभाग होण्याचे आवाहन करण्यात आले होते.

त्यानुसार रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक मराठी शाळा मेर्वी या शाळेने किल्ले शिवनेरी, राजगड, रायगड, प्रतापगड किल्ल्याची प्रतिकृती साकारून सेल्फीने सहभाग नोंदवला होता. या शाळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरीने अभिनंदन पत्र प्राप्त झाले आहे.

यानिमित्त शाळेचे मुख्याध्यापक हिदायत भाटकर, विषय शिक्षिका सौ. शर्वरी करगुटकर, उपशिक्षक चंद्रशेखर पेटकर, उपशिक्षिका संजया पावसकर, ऐश्वर्या गुरव, सर्व शिक्षक तसेच इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत सर्व विद्यार्थ्यांचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मंगेश म्हादये, उपाध्यक्षा सौ. सुजाता गोठणकर, शिक्षण तज्ञ संतोष कुरतडकर, सर्व पदाधिकारी पालक आणि ग्रामस्थ, पूर्णगड केंद्राचे केंद्रप्रमुख संजय राणे यांनी सर्व शिक्षकांचे आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!