गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या महिला व्हॉलीबॉल संघाला सुवर्णपदक व सांघिक विजेतेपद

रत्नागिरी : येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या (स्वायत्त) महिला व्हॉलीबॉल संघाने सुवर्णपदक प्राप्त केले आणि शैक्षणिक वर्ष २०२५-२६ चे मुंबई विद्यापीठ अंतर्गत कोकण विभाग महिला व्हॉलीबॉल स्पर्धेचे सांघिक विजेतेपद पटकावले.
या स्पर्धा १६ ते १८ ऑक्टोबर दरम्याने मुंबई विद्यापीठ अंतर्गत कोकण झोन नं – ४ आणि जीआयटी घरडा इंजिअरिंग महाविद्यालय लवेल (ता. खेड, जि. रत्नागिरी) यांच्या संयुक्त विद्यमाने झाल्या. या स्पर्धेत महाविद्यालयाच्या महिला संघाने कोंकण विभाग नं.४ महिला व्हॉलीबॉल स्पर्धेचे सुवर्ण पदक व सांघिक विजेतेपद पटकावले. महाविद्यालयाच्या सुवर्णपदक विजेत्या महिला व्हॉलीबॉल संघात मधुरा राऊत, सानिका लिंगायत, प्रसिद्धी सोनावणे, श्वेता खोडे, कृणाली सावंत, श्रेया सारंग, प्रियंका भोंगले, तनिष्का शिरधनकर, स्वरा शिंदे, श्रावणी शिंदे, शृजेश्वरी आवळकर, स्नेहा कदम, समीक्षा धनवे, श्रावणी शेलार या विद्यार्थिनींचा सहभाग होता.
महाविद्यालयाच्या महिला व्हॉलीबॉल संघाला क्रीडा संचालक डॉ. विनोद शिंदे, क्रीडा शिक्षक प्रा. कल्पेश बोटके, गौरांग कुर्टे, मिनार कुर्टे, यांचे मार्गदर्शन लाभले.
मुंबई विद्यापीठ अंतर्गत कोंकण विभाग नं.४ महिला व्हॉलीबॉल स्पर्धेतील सुवर्ण पदक आणि सांघिक विजेेतेपद प्राप्त करणाऱ्या महाविद्यालयाच्या महिला व्हॉलीबॉल महिला संघाला र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीमती शिल्पा पटवर्धन, कार्यवाह सतीश शेवडे, जिमखाना समितीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर केळकर, संस्थेचे सर्व सदस्य तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, तीनही शाखांचे उपप्राचार्य, जिमखाना कमिटीचे उपाध्यक्ष डॉ. विवेक भिडे, सर्व प्राध्यापक, कर्मचारी, सेवक यांनी अभिनंदन केले आणि पुढील स्पर्धेच्या यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.



