क्रीडामुख्य बातमी

जागतिक योग दिनी शिर्के प्रशालेच्या दोनशे स्काऊट गाईडसचा सहभाग; मान्यवरांकडून कौतुक

रत्नागिरी : जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा कार्यालय, योग संघटना, जिल्हा स्काऊट गाईड संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जागतिक योग दिन छ. शिवाजी स्टेडीयम येथे उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाला. यावेळी विद्यार्थ्यांसह अपर जिल्हाधिकारी श्री. सुर्यवंशी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वैदेही रानडे, जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. शिंदे यांनी विद्यार्थ्यांसह विविध योगासनांची प्रात्यक्षिके केली.

जागतिक योग दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमात शहरातील विविध शाळांसह शिर्के प्रशालचे सुमारे दोनशे स्काऊट आणि गाईड सहभागी झाले होते. रा. भा. शिर्के प्रशालेच्या स्काऊटस आणि गाईडस यांनी विविध आसनांद्वारे योग प्रात्यक्षिके सादर केली. याप्रसंगी उपस्थित रत्नागिरी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांसह अपर जिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. शिंदे , डायट प्राचार्य डॉ. सुशील शिवलकर, तालुका अधिकारी श्री. दारूटकर, श्रीमती ऐश्वर्या सावंत, जिल्हा स्काऊट गाईड संघटक श्री. डिंगणे, ज्येष्ठ योग प्रशिक्षक राजेश आयरे, एअर स्काऊट गाईडचे प्रशांत जाधव यांनी विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिकांचे कौतुक केले.

यावेळी शिर्के प्रशालेचे शिक्षक रमेश ढोले, श्री. क्षीरसागर, दिनेश मासये, संजना डोईफोडे, सौ. हेगिष्टे आदी उपस्थित होते. शहरातील अनेक शाळांनी उत्स्फूर्त सहभाग दर्शविला याबद्दल उपस्थित मान्यवरांकडून सर्वांचे कौतुक करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!