दापोली आणि गुहागर येथे चाकरमानी उद्योग परिषदेचे आयोजन
२४ रोजी दापोलीत, तर २५ मे रोजी गुहागर येथे होणार परिषद : विविध विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन

दापोली : मे महिन्यात कोकणात आलेल्या चाकरमानी युवकांसाठी आणि स्थानिक बागायतदार शेतकरी मच्छिमार तरुण उद्योजकांसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध होत आहे. शेती, पर्यटन, मत्स्य उद्योग, अन्नप्रक्रिया, ग्रामीण उद्योग, सामूहिक शेती, सहकार, फार्मर प्रोड्यूसर कंपन्या या क्षेत्रात उद्योग सुरू करण्यास इच्छुक तरुणांसाठी २४ व २५ मे रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ यावेळेत दापोली आणि गुहागर येथे चाकरमानी उद्योग परिषदेचे आयोजन केले आहे.
२४ मे रोजी दापोलीतील शुभारंभ हॉल, फाटक कॅपिटल बिल्डिंग, दापोली-हर्णे रोड, राधाकृष्ण मंदिरासमोर (ता. दापोली, जि. रत्नागिरी), तर २५ मे रोजी श्री दुर्गादेवी देवस्थान फंड, गुहागर, (ता. गुहागर, जि. रत्नागिरी) येथे ही परिषद होईल. यासाठी १०० रुपये नाममात्र शुल्क आहे. या परिषदेत सहभागी होण्यासाठी नोंदणी आवश्यक आहे.
या परिषदेमध्ये संबंधित क्षेत्रातील यशस्वी उद्योजक आणि तज्ञ व्यक्ती मार्गदर्शन व प्रेरणा देतील. कोकणात पर्यटनाची क्रांती करणारे, सर्वत्र फेरीबोट सेवा सुरू करणारे व पहिली मोठ्या प्रमाणात मसाला शेती करणारे माजी आमदार डॉ. चंद्रकांत मोकल, दापोली गवे पंचक्रोशीमध्ये नर्सरी उद्योगाच्या माध्यमातून आर्थिक क्रांती करणारे शास्त्रज्ञ शेतकरी उद्योजक अरविंद अमृते, हळद लागवड तंत्रामध्ये राष्ट्रपती पुरस्कार विजेता युवा शेतकरी व निसर्ग पर्यटन तज्ञ सचिन कारेकर हे आधुनिक शेतीच्या माध्यमातून कोकणात क्रांती कशी करता येईल यावर मार्गदर्शन करतील. याशिवाय शेती आणि पर्यटनाची सांगड कशी घालायची याला दिशा देतील. गेली पन्नास वर्ष बांबू लागवड ५० एकर क्षेत्रामध्ये करणारे व एकरी एक लाख रुपये उत्पन्न बांबू लागवडीतून घेता येते हे प्रत्यक्ष सिद्ध करणारे शेतकरी मायकल डिसोजा, दलालांना आंबे न देता वीस हजार पेट्या म्हणजे एक लाख डझन आंबा स्वतः थेट ग्राहकांना विकणारा शेतकरी उद्योजक आबिद काजी हे कृषी विषयावरती बोलणार आहेत.
कोकणातील आजची सर्वात मोठी अर्थव्यवस्था मासेमारी आणि माशांची शेती आहे. शेती पर्यटन उद्योगा इतकीच क्षमता मत्स्य शेतीचे आहे दुर्दैवाने हे क्षेत्र कोकणात दुर्लक्षित आहे. यासाठी खूप साऱ्या शासनाच्या योजना आहेत याचा समन्वय करणाऱ्या या परिषदा असतील या विषयात प्रत्यक्ष कोळंबी शेती गेली २५ वर्षे करणारे ग्लोबल कोकणचे शिलेदार काशिनाथ तारी, आणि या विषयातील तज्ञ डॉ. राजू भाटकर, मच्छीमार उद्योजक नंदू चौगुले हे मत्स्य उद्योग या विषयांमध्ये मार्गदर्शन करतील.
कोकणचा पर्यटनाचा ब्रँड जागतिक स्तरावर नेणारे व पर्यटन विकासासाठी केली २५ वर्ष काम करणारे ग्लोबल कोकणचे संस्थापक संजय यादवराव, कोकणातील भव्य पर्यटन प्रकल्प उभारणारे अक्षय फाटक, कोकण पर्यटनाचा ब्रँड सागर सावलीचे मालक मंगेश मोरे, पर्यटनासाठी प्रशिक्षणाच्या सुविधा संपूर्ण कोकणात उभारणारे रिगल कॉलेजचे संस्थापक संजय शिर्के, डॉ. मनोज रावराणे, आदर्श पर्यटन प्रकल्प उभारणारे किरण खरे आणि अनेक मान्यवर पर्यटनाच्या सत्रामध्ये सहभागी होणार आहेत.
कोकणात जमिनी विकू नका, त्या विकसित करा याकरता प्रशिक्षण मार्गदर्शन दिशा देण्याचे काम पुढील काळात समृद्ध मराठी चेंबर ऑफ कॉमर्स आणि ग्लोबल कोकण करणार आहे. अशा परिषदा प्रत्येक तालुक्यात आयोजित करीत आहोत. गावागावात खऱ्या अर्थाने उद्योग विकासाची चळवळ त्यातून रोजगार आणि वर्षानुवर्ष मुंबई, पुण्यात जाणाऱ्या कोकणातील तरुण कोकणातच कसा राहील या दृष्टीने ही चळवळ आवश्यक आहे. मे महिन्यामध्ये कोकणात आलेले चाकरमानी आणि याचबरोबर कोकणात गावागावात काम करणारे उद्योगी शेतकरी मच्छिमार तरुण यांनी या परिषदेत सहभागी व्हावे आणि अधिक माहितीसाठी विजय राम कोळवणकर (सीईओ, समृद्ध मराठीचे चेंबर ऑफ कॉमर्स) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन कोकण चेंबर ऑफ कॉमर्स – ग्लोबल कोकण – कोकण क्लबचे संस्थापक अध्यक्ष संजय यादवराव यांनी केले आहे.
दरम्यान, या परिषदेचे संयोजन अनिष निंबकर, अरविंद महाडिक, अजय कोळंबेकर, यश घोसाळकर, नरेश पेडणेकर, मयुरेश शेठ हे करत आहेत.
चाकरमानी उद्योग परिषदेत सहभागी होण्यासाठी गुगल फॉर्म :
https://docs.google.com/…/1GeIJzRHUlFx8ASQyvHg2X51…/edit
कार्यालय संपर्क : 8779842009 / 9082550774 /. 7798295226
वेबसाईट : www.samruddhamarathi.org / www.samruddhakokan.org



