मुख्य बातमी
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
राष्ट्रीय एकता दिनानिमित्त अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घेतली शपथ

रत्नागिरी : माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी व राष्ट्रीय संकल्प दिवस आणि माजी उप पंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती व राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
“मी राष्ट्राचे एकता, अखंडता व सुरक्षा अबाधित राखण्यासाठी स्वत:ला समर्पित करीन, सरदार वल्लभभाई पटेल यांची दूरदृष्टी व कार्यामुळे देशाची एकता राखणे शक्य झाले. तसेच मी माझ्या देशाची अंतर्गत सुरक्षा अबाधित ठेवण्याकरिता माझे स्वत:चे योगदान देण्याचा सत्यनिष्ठापूर्वक संकल्प करीत आहे.” अशी राष्ट्रीय एकता दिनानिमित्त आज येथील अधिकारी कर्मचाऱ्यांनी शपथ घेतली.
यावेळी प्र. निवासी उपजिल्हाधिकारी राहुल गायकवाड आदींसह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.



