मुख्य बातमी

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रात राष्ट्रीय एकता दिन साजरा

रत्नागिरी : डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत असलेल्या रत्नागिरीतील झाडगाव येथील सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रात दरवर्षी प्रमाणे यावर्षीही ३१ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथिनिमित्त श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त ‘राष्ट्रीय एकता दिवस’ साजरा करण्यात आला.

यावेळी संशोधन केंद्र प्रमुख डॉ. केतन चौधरी, वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी (विभाग प्रमुख) यांच्या हस्ते सरदार वल्लभभाई पटेल आणि इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अपर्ण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित सर्वानी ‘राष्ट्रीय एकता दिन’ निमित्त एकतेची शपथ घेतली. डॉ. केतन चौधरी यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांचे देशाच्या एकीकरण मधील योगदान आणि त्यांचे कार्य याबाबत तर माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या कार्याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. याचवेळी राष्ट्रीय सतर्कता सप्ताह (२७ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर) निमित्त वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘सत्यनिष्ठता शपथ’ देण्यात आली.

यावेळी संशोधन केंद्रातील अधिकारी डॉ. एच.बी. धमगये (अभिरक्षक), सहाय्यक संशोधन अधिकारी प्रा. एन. डी. चोगले, प्रा. एस.बी. साटम, जीवशास्त्रज्ञ श्रीम. व्ही. आर. सदावर्ते, कार्यालय अधीक्षक श्री. एस. तांबे व प्रयोगशाळा सहाय्यक श्री. आर. एम. सावर्डेकर यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!