मुख्य बातमीराजकारण

ठाकरे सेनेचे तालुकाप्रमुख शेखर घोसाळे यांचा जिल्हा परिषद गटनिहाय गावभेट दौरा

प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीला उत्स्फूर्त प्रतिसाद : पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीनंतर संघटनेत नवचैतन्य

रत्नागिरी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रत्नागिरी तालुकाप्रमुख शेखर घोसाळे यांनी जिल्हा परिषद गटनिहाय दौऱ्याला प्रारंभ केला असून, या दौऱ्यात ते प्रत्येक गावातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या निवासस्थानी भेट देऊन संघटना मजबूत करण्यासंदर्भात चर्चा करत आहेत.

आठ दिवसांपासून पावस जिल्हा परिषद गटातील गावखडी, पूर्णगड, मेर्वी, शिवार आंबेरे, गावडे आंबेरे, डोर्ले, पावस, नाखरे गावांमध्ये भेटी दिल्या आहेत. यावेळी तालुका संघटक सुभाष पावसकर, युवासेना तालुकाधिकारी व शहर संघटक प्रसाद सावंत, विभाग प्रमुख किरण तोडणकर, मयुरेश्वर पाटील उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!