आबलोली येथे कार्तिकी एकादशीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

आबलोली (संदेश कदम) : गुहागर तालुक्यातील आबलोली बाजारपेठेतील श्री विठ्ठल रखुमाई प्रासादिक भजन मंडळ आबलोली कोष्टेवाडी यांच्या विद्यमाने कार्तिकी एकादशीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचा आबलोली पंचक्रोशीतील नागरिकांनी मोफत लाभ घ्यावा, असे जाहीर आवाहन श्री विठ्ठल रखुमाई प्रसादिक भजन मंडळ आबलोली कोष्टेवाडी मंडळाच्या वतीने मंडळाचे अध्यक्ष महेंद्र रेडेकर, उपाध्यक्ष अजित रेपाळ, सचिव सुधाकर उकार्डे, खजिनदार दिनेश नेटके यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
आज (२ नोव्हेंबर) सकाळी ६ वाजता अभ्यंग स्नान, सहस्त्रनाम व काकड आरती त्यानंतर दुपारी १२ वाजता मंडळाच्या भजनाचा कार्यक्रम होईल. त्यानंतर दुपारी ३ ते संध्याकाळी ५ या वेळेत महिलांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रम होईल. रात्री ९ ते ११ यावेळी हभप श्री. चितळे महाराजांचे स्वर कीर्तन, तर रात्री १२ वाजता पालखी सोहळा होईल.
उद्या (३ नोव्हेंबर) दुपारी १ वाजता महाप्रसादाचे वाटप केले जाणार असून, सायंकाळी ७ वाजता श्री विठ्ठल रखुमाई मंदिरामध्ये तुळशी विवाहाचे आयोजन करण्यात आले आहे.
मंगळवारी (४ नोव्हेंबर) सकाळी १० वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा होईल, त्यानंतर १ वाजता महाप्रसादाचे वाटप होईल. दुपारी ३ वाजता लकी ड्रॉ सोडत त्यानंतर रात्री ९.३० वाजता जय हनुमान मंच चिपळूण (बंडू पिरदनकर निर्मित) “महाराष्ट्राची लोककला” अस्सल मराठी संस्कृतीचा स्त्री-पात्रांसह विनोदाची धमाल हा कार्यक्रम सादर होणार आहे.
तीन दिवस चालणाऱ्या या संपूर्ण कार्यक्रमांना आबलोली पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन श्री विठ्ठल रखुमाई मंडळ आबलोली कोष्टेवाडी, नवतरुण मित्र मंडळ आबलोली, महिला मंडळ सभासद यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.



