मुख्य बातमी

नटश्रेष्ठ रमेश भाटकर स्मृती उत्सवी नाट्य स्पर्धेच्या २०२५-२६ च्या नव्या पर्वाचा आज होणार शुभारंभ

रत्नागिरी : नटश्रेष्ठ रमेश भाटकर स्मृती उत्सवी नाट्य स्पर्धेतील पहिला नाट्य प्रयोग आज (४ नोव्हेंबर) रोजी मौजे वाटद येथील श्री लक्ष्मी केशव देवस्थानच्या कार्तिक उत्सवात सादर होणाऱ्या “अश्रुंची झाली फुले” या नाटकाने होणार आहे.

उत्सवी रंगभूमीवर म्हणजेच पारावरच्या नाटकांसाठी पालकमंत्रीडॉ. उदय सामंत यांच्या संकल्पनेतून आणि विशेष अभ्यासाने आयोजित केलेली नाट्यस्पर्धा म्हणजे, आपल्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा रत्नागिरीच्या वतीने आयोजित केली गेलेली “नटश्रेष्ठ रमेश भाटकर स्मृती उत्सवी नाटकांची स्पर्धा” होय.

गतवर्षी सलग सहा महिने चाललेली देशभरातील एकमेव नाट्य स्पर्धा असा नावलौकिक प्राप्त झालेली आणि ४७ उत्सवी नाटकांचे यशस्वी सादरीकरण झालेली ही स्पर्धा या वर्षी म्हणजे २०२५ – २६ साठी दसऱ्याच्या दिवशीच उद्घोषित झाली आहे. या स्पर्धेतील पहिला नाट्य प्रयोग आज (४ नोव्हेंबर) रोजी मौजे वाटद येथील श्री लक्ष्मी केशव देवस्थानच्या कार्तिक उत्सवात सादर होणाऱ्या “अश्रुंची झाली फुले” या नाटकाने होणार आहे.

या उत्सव मंडळाचा इतिहास देखील ९० वर्ष जुना असून तितकीच जुनी नाट्य परंपरा हे मंडळ जपत आहे. स्पर्धेच्या नियमानुसार दोन मान्यवर परीक्षक म्हणून ज्येष्ठ रंगार्मी सौ. अनुया बाम आणि अमर तथा आप्पा रणभिसे काम पाहणार आहेत. या प्रसंगी नाट्य परिषदेच्या वतीने कार्याध्यक्ष समीर इंदुलकर, खजिनदार सतीश दळी, कार्यवाह वामन कदम, सहकार्यवाह/स्पर्धाप्रमुख अमेय धोपटकर, संतोष शंकर, ॲड. रजनी सरदेसाई, ॲड. श्रीकांत भाटवडेकर, विजय पोकळे, घनश्याम मगदूम, सनातन रेडीज, राजेंद्र तथा दादा कदम, सुनील बेंडखळे आदी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे कार्यकारिणी सदस्य उपस्थित राहणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!