मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

आबलोली वरची पागडेवाडी येथे गौराईंचे अतिशय उत्साही वातावरणात आगमन

आबलोली (संदेश कदम) : परंपरेनुसार नदीवर जाऊन पाऊसात उगवणाऱ्या रानटी तिरडा, सोनवेली सारख्या फुलांनी विधिवत मुखवट्यांची माहेरवाशीणींकडून पूजा अर्चा करून ढोल ताश्यांच्या गजरात अतिशय उत्साही वातावरणात गुहागर तालुक्यातील वरची पागडेवाडी येथे गौराईंचे घरोघरी आगमन झाले. माहेरवाशीणींनी नटून थटून पारंपरिक नऊवारी तर कुणी सहा वारी साड्यांच्या पेहरावात डोक्यात वेणी, गजरे माळून दीड दिवसांची पाहुणी म्हणून येणाऱ्या गौराईला आपल्या घरचीच कुणीतरी माहेरवाशीण घरी येतेय अशा भावनेने आणण्यात आली. यात छोट्या माहेरवाशीणीही अगदी हिरीरीने सहभागी झाल्या होत्या.

काल (३१ ऑगस्ट) झालेल्या उत्साही आगमनानंतर आज तेवढ्याच भक्तीभावाने व उत्साहात घरोघरी गौराईचे सौभाग्यवती सासुरवाशीणींकडून वाणाने भरलेले सूप (ओवसा ) गौराईसमोर ठेऊन पूजा अर्चा करण्यात आली व परंपरेनुसार गौराईला गोड तिखटाचा नैवेद्य दाखविण्यात आला. यावेळी महिलांच्या आनंदाला उधाण आले होते. प्रत्येक घरातून नाच गाणी, जखडी नृत्य पहायला मिळते आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!