राजापूरच्या मधु दंडवते, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत दहावी उत्तीर्ण, अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

राजापूर : येथील मधु दंडवते, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश प्रक्रिया २०२५ सुरू झाली असून, दहावी उत्तीर्ण अथवा अनुत्तीर्ण इच्छुक विद्यार्थ्यांनी http://www.admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज सादर करावेत, असे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्था, राजापूरचे प्राचार्य टी. एस. मिसाळ यांनी केले आहे.
या संस्थेमध्ये एक वर्ष कालावधी करिता मेकॅनिक डिझेल ४८, शिटमेटल वर्कर २०, ड्रेस मेकिंग २० व्यवसाय आहेत. तसेच दोन वर्ष कालावधीसाठी विजतंत्री- २०, प्रशितन व वातानुकुलित टेक्निशियन – ( RAC ) – २४ हे व्यवसाय आहेत.
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घेण्यासाठी तयार करण्यात आलेल्या प्रमाणित कार्यपध्दतीची माहिती पुस्तिका ऑनलाईन स्वरूपात वरील संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. अर्ज नोंदवून झाल्यावर उमेदवारांनी नजिकच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये जावून आपला अर्ज निश्चित करावा व त्यानंतर विकल्प सादर करावे. प्रवेश प्रक्रियेच्या विविध व्यवसाय अभ्यासक्रमांची माहिती देण्यात येईल. व्यवसायिक शिक्षण पूर्ण करून त्वरित रोजगार/स्वयंरोजगार अथवा उच्च शिक्षण संधी प्राप्त होण्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घ्यावेत.
प्रवेश संबंधित माहितीसाठी बी. ए. प्रभावळकर, शिल्पनिदेशक (९१५८१३०३२२), एस. एन. तळपे, शिल्पनिदेशक (९७३०८०२०४३), एस. एन. मोरजे शिल्पनिदेशक (९७६८४८९३८०) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.



