मुख्य बातमी

गावखडीत देवदिवाळीनिमित्त जत्रा 

गावखडी : हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असणारी रत्नागिरी तालुक्यातील गावखडी येथील ग्रामदेवता श्री जाकादेवीच्या मंदिरात देवदिवाळीनिमित्त एक दिवसीय जत्रा मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडली.

देवदिवाळी उत्सवानिमित्त मंदिरात श्री जाकादेवी, जुगादेवी, मानूबाय या देवींना मुखवटे लावले जातात. देवीची पूजा, आरती सर्व भक्तगणांच्या उपस्थितीत करण्यात आली.

छायाचित्र सौजन्य : दिनेश पेटकर, गावखडी

गावखडीतील श्री जाकादेवी नवसाला पावणारी, संकटसमयी हाकेला धावणारी जागृत देवी असल्यानेच देवदिवाळी निमित्त एक दिवस होणाऱ्या जत्रेत हजारो भाविकांची अलोट गर्दी दिसून येत आहे. देवीची ओटी भरण्यासाठीच सुवासिनी महिला मुंबई, पुणे, रत्नागिरी येथून आल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!