मुख्य बातमी

विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या उपस्थितीत रत्नागिरीत स्मार्ट एआय “रत्नसेतू” व्हॉट्सॲप चॅटबॉटचे लोकार्पण

रत्नागिरी : जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या रत्नागिरी पोलीस दलाच्या स्मार्ट एआय “रत्नसेतू” या व्हॉट्‌सॲप चॅटबॉटचा लोकार्पण सोहळा कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांच्या हस्ते संपन्न झाला.

या वेळी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, तसेच पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.

“रत्नसेतू” या चॅटबॉटद्वारे नागरिकांनी त्यांच्या विविध तक्रारी, माहिती किंवा समस्या व्हॉट्सॲप नंबर ९३७१४१५६१२ या क्रमांकावर यावर पाठवता येणार आहेत. या चॅटबॉटची ज्येष्ठ नागरिक सहायता, बाल मदत सहायता, महिला सहायता, उद्योग-व्यापार सहायता, गोपनीय सूचना, सागरी सुरक्षा सहायता अशा स्वरूपाची माहिती देणे अगर घेणे आदी माहितीसाठी या डिजिटल माध्यमाची सुरुवात करण्यात आली आहे. नागरिकांना त्यांनी नोंदविलेल्या तक्रारींची सद्यस्थितीची माहिती मोबाइलच्या एका क्लिकवर मिळणे शक्य होणार आहे.

“रत्नसेतू” – स्मार्ट एआय चॅटबॉट, या जलद, सोप्या आणि ऑनलाईन सेवेचा फायदा सर्व नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक श्री. बगाटे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!