प्रमोद पवार यांचे निधन

आबलोली (संदेश कदम) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक, धार्मिक आणि शैक्षणिक कार्यात स्वत:ला झोकून देणारे बौद्धजन सहकारी संघ तालुका गुहागर, बौद्धजन सहकारी संघ शाखा क्र.५० आबलोली संघटनेचे सल्लागार, आबलोली सुपुत्र आणि मुंबई पोलिस दलातील हेड कॉन्स्टेबल प्रमोद गंगाराम पवार (वय ५१) यांचे नुकतेच मुंबई येथे उपचारादरम्यान निधन झाले.
त्यांच्या पाश्चात पत्नी,१ मुलगा, १ मुलगी,बहिण,भाऊ, भावजय, चुलत भाऊ असा मोठा परिवार आहे. प्रमोद गंगाराम पवार यांचा पुण्यानुमोदन धम्म संस्कार आणि आदरांजली सभा असा संयुक्त कार्यक्रम आबलोली येथील आनंदवन बुद्ध विहार येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृहात १ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता बौद्धजन सहकारी संघ शाखा क्रमांक ५० आबलोली या संघटनेतर्फे होणार आहे.
या संपूर्ण धम्म संस्कार आणि आदरांजली सभेला सर्वांनी वेळेत उपस्थित रहावे, असे आवाहन बौद्धजन सहकारी संघ शाखा क्र.५० आबलोली, आनंदवन बुद्ध विहार मौजे आबलोली या धम्म संघटना यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.



