मुख्य बातमी

नगरपालिका/नगरपंचायत निवडणुकीसाठी जिल्ह्यात ६८.१४ टक्के मतदान

गुहागरला सर्वाधिक मतदान (७५.२६ टक्के), तर सर्वात कमी मतदान रत्नागिरीत (५५.०९ टक्के)

रत्नागिरी : जिल्ह्यातील जिल्ह्यातील राजापूर, रत्नागिरी, खेड. चिपळूण या चार नगरपालिका आणि गुहागर, लांजा, देवरुख या तीन नगरपंचायतींसाठी आज सकाळी ७.३० वाजता ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत ४९१९८ पुरुष, ५१२२७ महिला तर इतर १ अशा एकूण १ लाख ४२६ मतदारांनी मतदान केले. एकूण ६८.१४ टक्के मतदान झाले.

आज सकाळी ७.३० वाजता जिल्ह्यातील सर्वच मतदान केंद्रांवर मतदानाला शांततेत सुरुवात झाली. सकाळपासूनच मतदानासाठी मतदारांचा उत्साह ओसंडून वाहत होता. नव मतदारांपासून ते १०९ वर्षांपर्यंतच्या सर्वच मतदारांनी मतदानासाठी रांग लावत लोकशाहीच्या उत्सवात सहभाग घेतला. जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली तैनात केलेल्या चोख बंदोबस्तामुळे जिल्ह्यातील कोणत्याही मतदान केंद्रावर अनुचित प्रकार घडला नाही.

रत्नागिरी शहरातील पेठकिल्ला शाळेत मशीन बंद होण्याचा प्रकार वारंवार घडत होत. मतदानाला विलंब होत असल्यामुळे मतदानाची वेळ वाढवून देण्याची मागणी मतदारांमधून होत होती. मात्र या ठिकाणी सेवेत असलेल्या अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करत त्वरित मतदान यंत्र बदलण्यासाठी हालचाल सुरू केली.

दरम्यान, दुपारी साडेतीन वाजेपर्यंत जिल्ह्यात ५८.३१ टक्के मतदान झाले. यावेळेपर्यंत ८३ हजार २८३ मतदारांनी मतदान केले. यामध्ये ४० हजार ९०७ पुरुष तर ४२ हजार ३७५ स्त्री मतदारांनी मतदान केले.

सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत झालेले मतदान असे : नगरपालिका – रत्नागिरी : पुरुष ३१३२४, महिला ३३४२१ इतर १ एकूण मतदान ६४७४६ पैकी झालेले मतदान – पुरुष १७२४५, महिला १८४२२, इतर १ एकूण- ३५६६८, ५५.०९ टक्के.

चिपळूण : पुरुष २०९८६, महिला २१५९६ एकूण मतदान ४२५८२ पैकी झालेले मतदान – पुरुष १३४३९, महिला १३८७८ एकूण २७३१७, ६४.१५ टक्के.

खेड : पुरुष ६५००, महिला ७४९५ एकूण मतदान १३९९५ पैकी झालेले मतदान – पुरुष ४०६०, महिला ४६९१ एकूण ८७५१, ६२.५३ टक्के.

राजापूर : पुरुष ३९२४, महिला ४२१९ एकूण मतदान ८१४३ पैकी झालेले मतदान – पुरुष ३०९२, महिला २९७९ एकूण ६०७१, ७४.५५ टक्के.

नगरपंचायत लांजा : पुरुष ७०८७, महिला ७१४५ एकूण मतदान १४२३२ पैकी झालेले मतदान – परुष ५१२३, महिला ४९९० एकूण १०११३, ७१.०६ टक्के.

देवरुख : पुरुष ५२०८, महिला ५५८१ एकूण मतदान १०७९८ पैकी झालेले मतदान – पुरुष ३९९५, महिला ४०२५ एकूण ८०२०, ७४.३३ टक्के.

गुहागर : पुरुष २८५६, महिला ३१०५ एकूण मतदान ५९६१ पैकी झालेले मतदान –पुरुष २२४४, महिला २२४२ एकूण ४४८६, ७५.२६ टक्के.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!