मुख्य बातमी
जि.प. माजी शिक्षण व अर्थ सभापती ह.भ.प. शरद (दादा) बोरकर यांचा पुण्यस्मरण दिन साजरा

रत्नागिरी : जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व अर्थ सभापती ह.भ.प. शरद (दादा) बोरकर यांचा चौथा पुण्यस्मरण दिन ३ डिसेंबर रोजी साजरा करण्यात आला. यावेळी भारतीय जनता पार्टी कार्यालय वाटद खंडाळा येथे प्रतिमा पूजन करण्यात आले.
या प्रसंगी तालुका अध्यक्ष विवेक सुर्वे, विजय धनावडे, प्रकाश नाचरे, अमोल बैकर, निखिल बोरकर, उदय माने, समीर बोरकर आदी उपस्थित होते.
तसेच कै. दादा बोरकर यांचे समाजसेवेचे कार्य सतत सुरू राहण्यासाठी बोरकर दादा कुटुंबीय व मित्रमंडळ यांच्याकडून निवळीतील माहेर संस्था येथे त्यांच्या आवश्यकतेनुसार भेटवस्तू देण्यात आल्या. याप्रसंगी समीर बोरकर, अनिकेत डोंगरे उपस्थित होते.



